Ad will apear here
Next
डहाणूमध्ये पुनरागमन आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिर

डहाणू (पालघर) : नोव्हेंबर-डिसेंबर २०१६मध्ये डहाणू तालुक्यातून हजारोंच्या संख्येने वीटभट्ट्या व बांधकाम आणि इतर कामांसाठी स्थलांतरित झालेल्या बहुतांश कुटुंबांचे गावामध्ये पुनरागमन झाले आहे. या सर्व कुटुंबांची तज्ज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याकरिता डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात नुकतेच भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

या शिबिरात एकूण ८६० (गरोदर व स्तनदा माता-१७१ आणि लहान मुले - ६८९) रुग्णांची तपसणी स्त्री-रोग ब बालरोगतज्ज्ञांमार्फत करण्यात आली. तीन मुलांना पुढील उपचारांसाठी सेलवास येथे पाठविण्यात आले. दोन मातांना डहाणू येथे दाखल करण्यात आले. ३२ महिलांची सोनोग्राफी करण्यात आली. रुग्णांची ने-आण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वाहनव्यवस्था करण्यात आली होती. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण यादव आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चव्हाण यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स आणि डहाणू लायन्स क्लबच्या सहयोगाने हे शिबिर पार पडले. 

पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी उपक्रमाला शुभेच्छा देऊन शिबिराची पाहणी केली. उपसंचालक (आरोग्य सेवा, मुंबई, मंडळ-ठाणे) डॉ. रत्ना रावखंडे, पालघर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे, उपजिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद चव्हाण आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केळकर आदी मान्यवरांनी या शिबिराला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी त्या संदर्भातील माहिती दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VYXDBD
Similar Posts
शाळांमध्ये स्वच्छताविषयक मतदान पालघर : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षी शाळा सुरू
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत पालघर : समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ६३ जोडप्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाला जिल्हा
पालघरमध्ये योगदिनी विविध उपक्रम पालघर : योगसाधना हे भारताने जगाला आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे. योग ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक साधना असून, यामुळे मानवी जीवन समृद्ध होऊन शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतातील पाच हजार वर्षे जुन्या असलेल्या या साधनेला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कारण तीन
पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १२ जून २०१७ रोजी अध्यक्षा श्रीमती सुरेखा थेतले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. सर्व समित्यांचे सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. के. जेजुरकर, तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख या वेळी उपस्थित होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language